The Fed, the ECB, and Inflation in the SpotlightThe Fed, the ECB, and Inflation in the Spotlight
Uniswap: As revenue rises, will UNI’s prices grow as well?Uniswap: As revenue rises, will UNI's prices grow as well?

Gold Silver Price Today : आज दिवाळीचा (Diwali 2023) पहिला दिवस आहे. सणासुदीच्या काळात सातत्याने घसरण झाल्यानंतर आता सोन्याचे भाव आज स्थिरावले आहेत. रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर चांदीची किंमत प्रति किलो 73000 रुपये आहे. कर आणि उत्पादन शुल्कामुळे सोन्या-चांदीची किंमत दररोज चढ-उतार होत असतो. आज सोने आणि चांदीचे दर स्थिर आहेत.

24 कॅरेट सोन्याची किंमत काय?

24 कॅरेट 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव आज 60600 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 55550 रुपये आहे. याआधी गेले काही दिवस सोन्याच्या दरात सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. मात्र, आज सोनं-चांदीचे दर स्थि आहेत. नोव्हेंबरच्या या आठवड्यात सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण झाल्यानंतर आता त्याचे भाव स्थिरावले आहेत.

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)

  • मुंबई – मुंबईत सोन्याचा भाव 60600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • दिल्ली – सोन्याचा भाव 60750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)
  • कोलकाता – सोन्याचा दर 60630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
  • चेन्नई – सोन्याचा दर 61090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)

  • पुणे – 60600 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
  • नाशिक – 60630 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Rate)
  • नागपूर – 60600 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Rate)
  • कोल्हापूर – 60600 रुपये प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव घसरत आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव 3.14 च्या डॉलर घसरणीसह 1,955.71 डॉलर प्रति औंस दराने व्यवहार करत आहे. तर, चांदी 0.01 डॉलरच्या वाढीसह 22.65 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांवर कॅरेट मूल्य दाखवले जाते, जे त्याची शुद्धता दर्शवते. 24 कॅरेट सोने पूर्णपणे शुद्ध असते. कमी कॅरेट सोन्यात इतर धातूंचे मिश्रण असू शकते. तसेच, सोन्याचे प्रतिस्थापन मूल्य विशिष्ट गुरुत्व परीक्षक हे उपकरण वापरून निर्धारित केले जाऊ शकते. हे उपकरण सोन्याचे वजन आणि तुम्ही दिलेले वजन यांच्यातील गुणोत्तर मोजते, ज्यामुळे तुम्हाला शुद्धता तपासता येते. सोन्याच्या शुद्धतेबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही स्थानिक सुवर्ण महामंडळ किंवा प्रमाणित ज्वेलर्सचा सल्ला घेऊ शकता.

महत्त्वाच्या इतर बातम्या :


Source link

About the Author: Editorial team of BIPNs

Main team of content of bipns.com. Any type of content should be approved by us.

Share your opinion. And leave a reply within the comments from below.

All Crypto Coins here »