Fidelity Joins Race For A Spot Ethereum ETFFidelity Joins Race For A Spot Ethereum ETF
ChatGPT News | Sam Altman: OpenAI (ChatGPT) Co-Founder & President Resign As Board Fires Sam AltmanChatGPT News | Sam Altman: OpenAI (ChatGPT) Co-Founder & President Resign As Board Fires Sam Altman

Gold Silver Rate Today : दिवाळीनंतर (Diwali 2023) आज सोन्याचे भाव (Gold Rate Today) आज स्थिरावले आहेत. शनिवारी, 18 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. आज चांदीची किंमत (Silver Rate Today) 500 रुपयांनी कमी झाली आहे. कर आणि उत्पादन शुल्कामुळे सोन्या-चांदीची किंमत दररोज चढ-उतार होत असतो. आज सोन्याचा भाव दर स्थिर आणि चांदी स्वस्त झाली आहे.

सोने-चांदीचे आजचे दर काय?

आज देशात सोन्याचे दर स्थिर आहेत. 24 कॅरेट 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव आज 61690 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 56550 रुपये आहेत. दिवाळीपासून सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज एक किलो चांदीचा दर 76,000 रुपये आहे. चांदीचा दर (Silver Rate Today) शुक्रवारीही एक किलो चांदीचा दर 76,500 रुपये होता. 

दिवाळीनंतर सोन्याच्या दरात 1800 रुपयांची वाढ

दिवाळीनंतर सोन्याच्या दरात प्रती तोळा 1800 रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर हे उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकाच्या व्याज दरात वाढ न झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वळविला असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ होऊन ही दर वाढ झाली असल्याचं सांगितलं जात आहे. 

दिवाळीत राज्यभरात 500 कोटी रुपयांची उलाढाल 

सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी ग्राहकी कायम असल्याचा दावा सोने व्यावसाईकांनी केला आहे. दिवाळी काळात सोन्याचे दर हे जीएसटीसह 61500 रुपये इतके होते, दिवाळीत सोन्याला मोठी मागणी असल्याने राज्यभरात 500 कोटी रुपयांचे सोने विकलं गेल्याचं सांगितलं जात आहे. दिवाळीनंतर सोन्याची मागणी कमी होत असल्याचा नेहमी अनुभव असतो, त्यामुळे सोन्याचे दर देखील कमी होत असतात. यंदा मात्र यांच्या अगदी विरुद्ध चित्र सुवर्णनगरीमध्ये पाहायला मिळत आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात घसरण होण्याच्या ऐवजी सोन्याच्या दरात प्रती तोळा 1800 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर पुन्हा एकदा जीएसटीसह 63300 रुपये इतक्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत.

मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ

जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल ब्यांकाच्या व्याज दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, त्यामधे कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात न आल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा जास्तीचा परतावा मिळावा, त्याचबरोबर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे आपला कल वळविल्याने मागणीत वाढ होऊन सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. या वाढलेल्या दरामुळे सोन्याचे दर पुन्हा एकदा उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. आगामी काळात ही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता

सोन्याच्या वाढत्या दराच्याबाबत ग्राहकांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, सोन्याचे वाढेलेले दर सर्व सामान्य ग्राहकांच्या अवाक्या बाहेरचे आहेत. मात्र, सोन्याचे दर आगामी काळात पुन्हा वाढण्याची शक्यता लक्षात घेता आणि सोने खरेदी ही फायदेशीर गुंतवणूक असल्याने आज सोन्याचे दर काहीही असले तरी खरेदी ही परवडणारी ठरणार असल्याचं ग्राहकांनी म्हटलं आहे.


Source link

About the Author: Editorial team of BIPNs

Main team of content of bipns.com. Any type of content should be approved by us.

Share your opinion. And leave a reply within the comments from below.

All Crypto Coins here »