PBOC plans to enhance yuan internationalization and financial market liberalization By Investing.comPBOC plans to enhance yuan internationalization and financial market liberalization By Investing.com
Will the crypto market’s bull run last?Will the crypto market's bull run last?

Gold Silver Rate Today: धनत्रय़ोदशीला सोने-चांदीने स्वस्ताईचा मुहूर्त गाठला. ग्राहकांना सराफा बाजाराने आनंदवार्ता दिली आहे. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. या आठवड्याने स्वस्ताईचे सत्र सुरु ठेवले आहे. हा निव्वळ योगायोग म्हणावा की सराफा बाजाराचे धोरण यापेक्षा भाव स्वस्त झाले हीच दिलासादायक बाब आहे. सोने-चांदी इतके स्वस्त झाले.

Gold Silver Rate Today : दिवाळीत सोने-चांदीची स्वस्ताई, धनत्रयोदशीला आनंदवार्ता

नवी दिल्ली | 10 नोव्हेंबर 2023 : …आणि तो सुदिन आला. धनत्रयोदशीला सोने खरेदी शुभ मानण्यात येते. गेल्या आठवड्यापासून घसरणीचे सत्र या आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात सुरुच आहे. भाव घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सणासुदीत सोने-चांदीने स्वस्ताईचा मुहूर्त गाठल्याने ग्राहकांना हायसे वाटले. या आठवड्यात सराफा बाजारात गर्दी उसळली आहे. पण भाव कमी झाल्याची वार्ता कानोकानी पोहचल्यावर सराफा बाजारात तोबा गर्दी झाली आहे. आज धनत्रयोदशीला सोने-चांदी (Gold Silver Price Today 10 November 2023) खरेदी करणाऱ्यांना स्वस्तात मौल्यवान धातू खरेदी करता येतील. या आठवड्यात किंमतीत इतकी घसरण झाली.

सोने 1660 रुपयांनी स्वस्त

या दहा दिवसांत सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. 31 ऑक्टोबरपासून सोन्यात 1650 रुपयांची स्वस्ताई आली. या चार दिवसांचा विचार करता, सोन्यात 880 रुपयांची घसरण झाली. 4 नोव्हेंबर रोजी सोने 110 रुपयांनी उतरले. 5 नोव्हेंबरमध्ये बदल झाला नाही. तर 6 नोव्हेंबर रोजी 150 रुपयांनी भाव उतरले. 7 नोव्हेंबर रोजी 100 रुपयांची घसरण झाली. 8 नोव्हेंबर रोजी किंमती 160 रुपयांनी घसरल्या. 9 नोव्हेंबर रोजी 440 रुपयांनी सोने स्वस्त झाले. आता 22 कॅरेट सोने 55,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट


हे सुद्धा वाचा



चांदीत 2000 रुपयांची स्वस्ताई

आठवड्याच्या सुरुवातीलाच 6 नोव्हेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. नंतर चांदीने आनंदवार्ता दिली. 7 नोव्हेंबर रोजी किंमती 700 रुपयांनी घसरल्या. 8 नोव्हेंबर रोजी 1000 रुपयांची स्वस्ताई आली. तर 9 नोव्हेंबर रोजी किंमती 300 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,097 रुपये, 23 कॅरेट 59,856 रुपये, 22 कॅरेट सोने 55,049 रुपये झाले. 18 कॅरेट 45,073 रुपये, 14 कॅरेट सोने 35,157 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदी घसरली. एक किलो चांदीचा भाव 70,300 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

YouTube video player

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.


Source link

About the Author: Editorial team of BIPNs

Main team of content of bipns.com. Any type of content should be approved by us.

Share your opinion. And leave a reply within the comments from below.

All Crypto Coins here »